ONLINE TEACHER’S TRAINING CORRECTION PROCESS, TIME TABLE

ONLINE TEACHER’S TRAINING CORRECTION PROCESS, TIME TABLE
img 20221021 1256005109094376766484682

अत्यंत महत्वाचे- ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रीयेबाबत… सद्यस्थितीमध्ये काही प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. *सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी*.


उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.

आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत देखील http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
दुरुस्ती प्रक्रिया

शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९ /प्र.क्र. ४३/प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१ तील मुद्दा क्र.१ (क) नुसार राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी अनुक्रमे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दिनांक ०१ जून २०२२ पासून ऑनलाईन स्वरुपात व्यवस्थित सुरु आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्ष्णार्थ्यांनी केलेल्या नावनोंदणीतील त्रुटी दुरुस्तीसाठी दिनांक २२ जून २०२२ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. सदर मुदतीत ज्या प्रशिक्ष्णार्थ्यांनी दुरुस्ती नोंदणी केली होती त्यांचे प्रशिक्षण व्यवस्थित सुरु आहे. सद्यस्थितीत राज्यातील एकूण ९४,५४१ शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यानुसार आजतागायत एकूण ८८,५३९ प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करून घेतले आहे. उर्वरित प्रशिक्षणार्थी हे आपले प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. एकंदरीत मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याने दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा खुली केल्यामुळे प्रशिक्षण यंत्रणेवर ताण येवू नये यासाठी दिनांक २२ जून २०२२ नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली नाही. परंतु अद्यापही काही प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण अपूर्ण असल्याने व जवळपास ८८,५३९ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थ्यांची माहिती दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा खुली करण्यात येत आहे.

यासाठी प्रशिक्ष्णार्थ्यांचे खालील ०४ गट करण्यात येत आहे, १. प्रशिक्षण पूर्ण केलेले व प्रमाणपत्र डाऊनलोड केलेले प्रशिक्षणार्थी

२. प्रशिक्षण पूर्ण केलेले व प्रमाणपत्र अद्याप प्राप्त न झालेले प्रशिक्षणार्थी

३. प्रशिक्षणास लॉगिन केलेले पण प्रशिक्षण पूर्ण न केलेले प्रशिक्षणार्थी

४. प्रशिक्षणास अद्याप लॉगिन च न केलेले प्रशिक्षणार्थी


अ. क्र. विषय तपशील
कार्यवाहीचा दिनांक
१. प्रशिक्षणार्थी माहिती दुरुस्ती प्रक्रिया २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२
२. प्राप्त माहितीनुसार आवश्यक पडताळणी प्रक्रिया ०१.११.२०२२ ते ०३.११.२०२२
३. अंतिम माहिती इन्फोसिस प्रशिक्षण प्रणालीस सादर करणे व प्रणालीवर अद्ययावत करणे. ०४.११.२०२२ ते १०.११.२०२२
४. प्रशिक्षणार्थी यांचे दुरुस्तीनुसारचे प्रशिक्षण सुरु १२.११.२०२२ पासून

2 Comments

  1. Sandeep Jadhav

    नवीन नोदणी करायची आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *