प्रसिध्दीपत्रक
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२१
दि. २१ नोव्हेबर २०२१
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२१/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२१ पेपर I (इ.१ली ते ५वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा अंतरिम निकाल परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पेपर I व II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. २१/१०/२०२२ रोजी सांयकाळी ५:०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे दि. ०५/११/२०२२ पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०५/११/२०२२ पर्यंत mahatet21.msce@gmail.com या ईमेल वर पाठवावे. दिनांक ०५/११/२०२२ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा तसेच ईमेल व्यतिरिक्त अन्य मार्गाने आलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प./ शिक्षण निरिक्षक मुंबई (उ/द/प) यांचेमार्फत पाठविण्यात येईल.
पुणे – २१/१०/२०२२
Cardamoun (शैलजा दराडे)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे – ०१.

