विषय:- माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव आयोजित करणेबाबत…. संदर्भ:- मा.उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे जा.क्र. राशैसंप्रपम/कला क्रीडा / कला उत्सव/२०२२-२३/दि.३०/०९/२०२२ चे पत्र. उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन २०१५ – १६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात.
सन २०२२ – २३ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, तालवाद्य वादन, स्वरवाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य,द्वीमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प व खेळणी तयार करणे व नाट्य ( भूमिका अभिनय) या १० कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे सन २०२२ – २३ मध्ये राज्याच्या १० कला प्रकारांचे १० संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या Online कला उत्सवासाठी दि. १० डिसेंबर २०२२ पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहेत.
राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत.
कलाउत्सव वेबसाईट
अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत · विद्यार्थ्यांसाठी सूचना: → एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली असावी व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
» निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडिओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
» व्हिडिओमधील चित्र व आवाजात सुस्पष्टता असावी तयार केलेला व्हिडिओ व चित्र ,शिल्प खेळणी तयार करणे या कलाकृतींचे सोबत ५ फोटो विद्यार्थ्याने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #Kalautsavmah२०२२ या हॅशटॅगचा वापर करून दि.२० ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा.
व्हिडीओ पोस्ट करताना विद्यार्थ्याने आपले नाव ,इयत्ता,शाळेचा पत्ता ,शाळेचा Udise क्रमांक,तालुका,जिल्हा,मेल आयडी ,संपर्क क्रमांक व भाग घेत असलेला कला प्रकार इ.उल्लेख करावा.
» फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडिओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
» तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav/ या पोर्टल जाऊन करावी.
» नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
» ही नोंदणी करताना फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर किंवा यु टूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना यापैकी प्राप्त झालेली कोणतीही एकच link नमूद केलेल्या ठिकाणी Pasteकरावी.
> एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यांची एकच पोस्ट असावी. तसेच एका विद्यार्थ्याला एका वेळी एकाच स्पर्धेत भाग घेता येईल. कला उत्सव स्पर्धेमध्ये राज्य स्तरापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याला परत भाग घेता येणार नाही. » आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल. → एका वेळी एका पोस्टमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे / पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे साहित्य अपलोड केल्यास/पोस्ट केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
» विद्यार्थ्यांच्या / पाल्याच्या व्हिडीओ सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय / आक्षेपार्ह विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
All the winners (1st, 2nd and 3rd) will be awarded cash prize*, a trophy and medal. All participants will be given a certificate of National level participation. The cash awards in each art forms are as under: * It would be pertinent to mention that the awarded cash prize would be digitally transferred to the account of State Education Department.