WORLD HAND WASH DAY 2023

WORLD HAND WASH DAY 2023

जागतिक हात धुवा दिन

images 366043151137718361913.

(स्वच्छ भारत
राज्य पाणी व स्वच्छता मिशन
(SWSM) १ ला मजला, सिडको भवन (दक्षिण कक्ष), एक काम स्वच्छत से जोर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४००६१४ दूरध्वनी क्र. ०२२-२७५६२५४६, २७५६२३६३ ईमेल : pdsbmg.swsm@gmail.com पत्र क्र.रा.पा.व स्व.मि./माशिसं/१०२१/प्र.क्र.०६/२०२२-२३ / 2253 दि.१२.१०.२०२२
Har Ghar Jal Jal Jeevan Mission


प्रति, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
विषय : जागतिक हात धुवा दिन १५ ऑक्टोबर २०२२ साजरा करणे बाबत
संदर्भ : शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजीचे पत्र १५ ऑक्टोबर हा “जागतिक हात धुवा दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

२००८ पासून १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जात असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या दिनाचे महत्व मोठे आहे. या निमित्ताने आरोग्या संदर्भात हातांच्या स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेवून व्यापक जनजागृती करण्याची संधी दरवर्षी उपलब्ध होत असते.

THEME 2023


या दिनाची यावर्षीची संकल्पना (Theme) Unite for Universal Hand Hygiene ही आहे.

https://estudi.in/2022/09/top-selling-books-for-navodaya-exam-2023/

कोरोनाचा संसर्ग रोखण्यामध्ये हातांच्या स्वच्छतेने महत्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय डायरियासारख्या जीवघेण्या आजाराचा उगमही हातांच्या अस्वच्छतेशी निगडीत आहे. केवळ साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे डायरियापासून ४० टक्के बचाव करता येवू शकतो, यासाठी हातांच्या स्वच्छतेबाबत सर्वांनी एकजुठ होणे आवश्यक आहे हा यावर्षीच्या संकल्पनेचा गाभा आहे.


स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय यांच्या माध्यमातून भारत सरकारने स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. शाळास्तरावर देखील शालेय विद्यार्थ्यांमध्येही साबणाने हात धुण्याची सवय रुजावी याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून गावागावांत हातांची स्वच्छता, तिचे महत्व, सद्यस्थितीतील वर्तन याबाबत उपक्रमांचे आयोजन करता येवू शकते.

त्या अनुषंगाने गाव पातळीवर पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत.

१. आरोग्य केंद्रात हात धुण्याची सुविधा यावर्षीच्या संकल्पनेचा विचार करता आरोग्य कर्मचारी, आरोग्य सुविधा केंद्र यांच्यासाठी हात धुण्याबाबतचे उपक्रम आयोजीत करावे, यात आरोग्य सुविधांमध्ये हात धुण्याच्या सुविधा सुस्थितीत व कार्यान्वीत असतील याची विशेष काळजी घेण्याबाबत जागृतीवर भर असावा. आपल्या जिल्ह्यातील कोणतेही आरोग्य केंद्र कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी साबणाने हात धुण्याच्या सुविधेविना असणार नाहीत यादृष्टीने नियोजन करणे.

https://estudi.in/2022/09/top-selling-books-for-navodaya-exam-2023/


२. साबणाने हात धुण्याचे प्रात्याक्षिक व समुदाय बैठका
या उपक्रमांतर्गत गावपातळीवर सामुदायिक स्वरुपात साबणाने हात धुण्याचे प्रात्याक्षिके करण्यात यावीत. त्याचप्रमाणे साबणाने हात धुण्याचे महत्व व त्याचा आरोग्यास होणारा लाभ याबाबत चर्चा
व संवाद साधण्यात यावा.

३. साबण गोळा करण्यासाठी गाव पातळीवर रॅली विद्यार्थी हा नेहमीच सामाजिक बदलाची प्रेरणा ठरलेला आहे. ज्या सहजतेने विद्यार्थी बदल स्वीकारतात व त्याचा प्रसार करतात, ते लक्षात घेता या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे संयुक्तीक होईल. हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धता ही बऱ्याचदा शाळांसमोर समस्या असते.

या पार्श्वभूमीवर जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने साबण गोळा करण्यासाठी गावातून रॅली काढल्यास मोठ्या प्रमाणात साबण गोळा होऊ शकतील. या रॅलीच्या आदल्या दिवशी गावकऱ्यांना अशा प्रकारची -रॅली निघणार असून त्यावेळी प्रत्येक घरटी कमीत कमी किमतीचा किमान एक तरी साबण देण्यात यावा असे आवाहन करण्यात यावे व रॅलीच्या माध्यमातून शाळेसाठी साबण गोळा
करण्यात यावेत यासले मोका TRIात साता याला बोली- न मागतो नान TIMIRITA

३. साबण गोळा करण्यासाठी गाव पातळीवर रॅली विद्यार्थी हा नेहमीच सामाजिक बदलाची प्रेरणा ठरलेला आहे. ज्या सहजतेने विद्यार्थी बदल स्वीकारतात व त्याचा प्रसार करतात, ते लक्षात घेता या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे संयुक्तीक होईल. हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धता ही बऱ्याचदा शाळांसमोर समस्या असते. या पार्श्वभूमीवर जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने साबण गोळा करण्यासाठी गावातून रॅली काढल्यास मोठ्या प्रमाणात साबण गोळा होऊ शकतील. या रॅलीच्या आदल्या दिवशी गावकऱ्यांना अशा प्रकारची -रॅली निघणार असून त्यावेळी प्रत्येक घरटी कमीत कमी किमतीचा किमान एक तरी साबण देण्यात यावा असे आवाहन करण्यात यावे व रॅलीच्या माध्यमातून शाळेसाठी साबण गोळा करण्यात यावेत. यामुळे मोठ्या प्रमाणात साबण उपलब्ध होतील व शाळेमध्ये हात धुण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. याशिवाय रॅलीमुळे गावात साबणाने हात धुण्याबाबत जागृती होऊन
लोकांमध्ये जनजागृती होऊ शकते.

४. स्थानिक पातळीवर जागतिक हात धुवा दिनानिमित्त प्रचार व प्रसिद्धी
जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेमध्येही जागृती व्हावी यासाठी स्थानिक प्रसार माध्यमांमधून व्यापक जनजागृती करण्यात यावी. यासाठी जिल्ह्यातील विषय तज्ञांचे लेख स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करणे, समाज माध्यमांच्या माध्यमातून संदेश पाठविणे आदी उपक्रम घेण्यात
यावीत.

https://estudi.in/2022/09/top-selling-books-for-navodaya-exam-2023/

५. संस्था स्तरावर विविध उपक्रम / स्पर्धांचे आयोजन
शालेय स्तरावर किंवा गाव पातळीवर “जागतिक हात धुवा दिन” या निमित्त विविध (रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला, पोस्टर तयार करणे इत्यादी) स्पर्धांचे आयोजन करून सहभागी झालेल्या लोकांना स्थानिक अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देता येऊ शकेल. यामुळे मोठ्या प्रमाणात
जनजागृती होऊन जागतिक हात धुवा दिनास प्रसिद्धी प्राप्त होईल.

६. स्वच्छाग्रहींमार्फत गावोगावी जनजागृती
स्वच्छ भारत मिशनमार्फत जे स्वच्छाग्रही तयार करण्यात आले आहेत त्यांच्या मार्फत गावागावात व्यापक प्रमाणात साबणाने हात धुणे व आरोग्यदायी सवयी याबाबत जनजागृतीचे उपक्रम घेण्यात
यावेत.

७. महिला बचत गट, आदिवासी युवा गट आदींचा सहभाग
या उपक्रमांत महिलांचा तसेच गावातील युवा वर्गाचाही सहभाग मिळवावा. विशेषत: आदिवासी भागात जनजागृती करण्यासाठी युवा गटांमार्फत विविध उपक्रम हाती घ्यावेत.


जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात, माहिती शिक्षण व संवाद तज्ञांनी या सर्व उपक्रमांचे नियोजन करून या दिनी विविध उपक्रम यशस्वी करावेत, तसेच याबाबतचा सचित्र अहवाल राज्य पाणी व स्वच्छता कक्षास विनाविलंब

https://docs.google.com/spreadsheets/d/9pckxzę8dRWEWRIIWTZHUVCS9JHOY__ Qo/edit?usp=sharing&ouid=१०३६६४०४३२५७६८७३५२६०८&rtpof=true&sd=true

या लिंकवर जिल्हानिहाय असलेल्या स्वतंत्र शिट्सवर सादर करावा.

जिल्ह्यांनी काही नाविण्यपूर्ण पद्धतीने -जागतिक हात धुवा दिन साजरा केला असल्यास त्याचा अहवाल / बेस्ट पॅक्टीसेसही सादर करण्यात याव्यात.
आपला विश्वासू ।
(रणधीर सोमवंशी,
II प्रकल्प संचालक
राज्य पाणी व स्वच्छता मिशन प्रत-माहितीसाठी १. मा.प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर २. मा.सहसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर ३. अवर सचिव, पापु-१६, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई यांना माहितीस्तव ४. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सर्व यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *