ुआश्विन शु.५, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि:पंचमी, नक्षत्र:अनुराधा,
योग:प्रीति, करण:बावा,
सूर्य उदय:06:28, सूर्यास्त:18:20,
0२ ] ❂ सुविचार ❂
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
- प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ - चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे. ★ अर्थ ::~ प्रत्येकाच्या अधिकाराचे दिवस बदलतात
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0४ ] ❂ सुभाषीत ❂
━┅═▣◆★✧★◆▣═┅━ - न खलु वयस्तेजसो हेतुः ।
⭐अर्थ ::~
वय हे काही तेजाचे कारण असू शकत नाही. (ते स्वभावतःच असते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0५ ] ❂ दिनविशेष ❂ ★ 30. सप्टेंबर ★
★ आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
★ हा या वर्षातील २७३ वा (लीप वर्षातील २७४ वा) दिवस आहे. ~★ महत्त्वाच्या घटना ★~
●१९९८ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना ‘शांतिस्वरुप भटनागर’ पुरस्कार जाहीर
●१९९३ : लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.
●१९४७ : पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश ~★ जन्मदिवस / जयंती ★~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८० : मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू
◆१९३३ : प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक
◆१९६१ : चंद्रकांत पंडित – क्रिकेटपटू
◆१९२२ : हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक
◆१९०० : एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री ~★मृत्यू / पुण्यतिथी★~
●२००१ : ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे केन्द्रीय रेल्वे मंत्री, यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन
●१९९८ : चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदान’ चळवळीतील कार्यकर्त्या
●१९९२ : गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले.
●१९८५ : चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂
- ✹भारत मेरा महान ✹
उन्नत भाल हिमालय, सुरसरि गंगा जिसकी आन।
उन्मुक्त तिरंगा शांति – दूत बन देता है संज्ञान।
चक्र सुदर्शन-सा लहराए करता है गुणगान।
चहुँ दिशा पहुँचेगी मेरे भारत की पहचान।।
महाभारत, रामायण, गीता, जन-गण-मन सा गान।
ताजमहल भी बना, मेरे भारत का अमिट निशान।
महिला शक्ति बन उभरीं, महामहिम भारत की शान।
अद्वितीय, अजेय, अनूठा ही है, भारत मेरा महान।।
यह वो देश है जहाँ से, दुनिया ने शून्य को जाना।
खेल, पर्यटन और फिल्मों से, है जिसको पहचाना।
अंतरिक्ष पहुँच, तकनीकी प्रतिभाओं से विश्व भी माना।
बिना रक्त क्रांति के जिसने, पहना स्वाधीनी बाना।।
भाषा का सिरमौर, सभ्यता, संस्कार सम्मान।
न्याय और आतिथ्य हैं, मेरे भारत के परिधान।
विज्ञान, ज्ञान, संगीत, मिला आध्यात्म गुरु का मान।
ऐसे भारत को ‘आकुल’ का, शत-शत बार प्रणाम।।
~ आकुल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0७ ] ❂ प्रार्थना ❂
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
- ❂ जयोस्तुते श्रीमहन्मंगले
शिवास्पदे शुभदे ! ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥
हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥
–स्वातंत्र्यवीर सावरकर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0८ ] ❂ बोधकथा ❂
- ❃❝ सवय ❞❃
━═•●◆●●◆●•═━
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणा पासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला. 🌀❝ तात्पर्य ❞ ::~
जास्त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्या साठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂
━┅━▣◆★✧★◆▣═┅━ - आदर अशा लोकांचा करा
जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि; मैत्री अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही
महत्वाचे वाटत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂
━┅═▣◆★✧★◆▣═┅━ - ✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
◆ भीमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते ?
➜भीमाशंकर.
◆ नॅशनल डिफेन्स अँकॅडमी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➜पुणे.( खडकवासला )
◆ पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➜वर्धा.
◆ पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे ?
➜मध्य प्रदेश.
◆ महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारची जंगले आढळतात ?
➜पानझडी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
थोरव्यक्ती परिचय
- ❒ डॉ. अनिल भारद्वाज ❒
━═•●◆●★★●◆●•═━
💥 ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे संशोधन केले आहे, त्यात विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे. त्यांना भौतिकशास्त्रात प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे. 💥 उत्तर प्रदेशात जन्मले असले तरी गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ हीच त्यांची कर्मभूमी आहे. मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो. 💥 सूर्याभोवतीच फिरणारे दोन ग्रह असले, तरी पृथ्वी व मंगळ यांच्यात फरक आहे. पृथ्वीवर नायट्रोजन व ऑक्सिजन भरपूर आहे तर मंगळावर कार्बन डायॉक्साइड जास्त आहे. मंगळावर नैसर्गिक प्रक्रियातून निर्माण होणाऱ्या मिथेनचे अस्तित्व असले, तरी त्यामुळे तेथे जीवसृष्टी असेलच असे म्हणता येत नाही, असे ते सांगतात. भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत. 💥 चंद्रा अॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. भारद्वाज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगडचा, त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण लखनौ विद्यापीठातून झाले. वाराणसीच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी २००२ मध्ये ग्रह व अवकाश विज्ञान या विषयात पीएचडी केली.