नशामुक्त भारत अभियान अंतर्गत
“ तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षण संपन्न ”
नशामुक्त भारत अभियान, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी मुंबई शहर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, मुंबई शहर आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ आयोजित “तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षण ” यांचे आयोजन ओल्ड कस्टम हाऊस, तळमजला, फोर्ट, मुंबई येथे २१ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटक म्हणून मुंबई शहर चे जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी केले यांनी तज्ञ स्वंयसेवकाना व्यसनमुक्ती बद्दल मार्गदर्शन केले तसेच तज्ञ स्वंयसेवकाना व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात आली. तसेच यावेळी तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शनासाठी नव निर्माण फाउंडेशन चे प्रमुख सल्लागार बॉस्को डिसोझा यांनी व्यसन आणि व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणार्यी प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार चे वरिष्ठ राज्य समन्वयक इरम मलिक आणि अन्नू मौर्या हे उपस्थित होते. यांनी तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षणाथीना नशामुक्त भारत अभियान मुंबई शहरात व्यसनमुक्ती वर प्रसार, प्रचार कशा प्रकारे करावे, पुढील नियोजन याबद्दल पीपीटी द्वारे माहिती देण्यात आली.

यावेळी समाजकल्याण विभाग मुंबई शहर चे सहाय्यक आयुक्त श्री. प्रसाद खैरनार, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुंबई विद्यापीठाचे समन्वयक डॉ. सतिष पुराणीक, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुंबई समन्वयक क्रांन्ती ओकी, मुंबई शहरातील विविध महाविद्यालयातील ६१ तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षणाथी उपस्थित होते. येणाऱ्या काळात मुंबई शहरात व्यसनमुक्त कार्य साठी सक्रीय होऊन सहभागी होणार असे प्रशिक्षणार्थीनी मतं मांडले तसेच या वेळी नशाबंदी मंडळाचे स्वंयसेवक नंदु बनसोडे यांनी व्यसनमुक्ती पर गीत गाऊन उपस्थितीकांची मने जिंकली. या कार्यक्रमात सुत्रसंचलन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले यावेळी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली