गिरगाव डोल्हारपाडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

गिरगाव डोल्हारपाडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

तलासरी , दि. 6 सप्टेंबर

जि.प.शाळा गिरगाव डोल्हारपाडा येथील मैदानावर गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर या कार्यक्रमास सहकार्य करणारे मा.श्री.सिताराम खराड सर, मा.श्री.गजानन खांडाखुळे सर,श्री.पंकज धाडगा सर, श्री.राजेश वाघात सर, श्री.उमेश सर, श्री.गुलाब धोडी, श्री.कान्हा धाडगा सर…यांचे शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
इयत्ता 10वी ,12वी ,पदवीधर अशा एकूण पस्तीस मुलामुलींचा सत्कार करण्यात आला.जवळपास सर्व जण उपस्थित होते.उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.


प्रत्येक गुणवंतास शाल, आणि आकर्षक पुस्तके देण्यात आली.पदवीधर मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जि.प.प्रा.शाळा गिरगाव डोल्हारपाडा शाळेचे सहशिक्षक श्री.गजानन खांडाखुळे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
मा.श्री.पंकज धाडगा सर, मा.खराड सर,मा.वाघात सर ,केंद्र प्रमुख गिरगाव ,श्री.उमेश सर, श्री.कान्हा धाडगा सर .सौ.राधाताई, सौ खराड ताई ,सौ रयात ताई उपस्थित होते.या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्याचबरोबर तारपानृत्य सादर करण्यात आले.

img 20220906 wa00022988699839880528613
img 20220906 wa0003508179768935820235
img 20220906 wa00017064966192602724772


कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला.गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.राजेश धाडगा नी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम अतिशय सुंदर अप्रतिम होता.श्री.मनिष खराड, उतेश खराड, विग्नेश खराड, सुलक्षणा धाडगा यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *