रोटरी क्लब ऑफ बोरिवली (पूर्व) मुंबईतर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

रोटरी क्लब ऑफ बोरिवली (पूर्व) मुंबईतर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

रोटरी क्लब ऑफ बोरिवली (पूर्व) मुंबईतर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

जिल्हा परिषद पालघर मार्फत जिल्हा परिषद शाळेत प्रायोगिक तत्त्वावर नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र इयत्ता पहिली ते आठवी प्रमाणे शासनामार्फत देणाऱ्या विविध लाभाच्या योजना उदाहरणार्थ गणवेश, पाठ्यपुस्तक, शालेय पोषण आहार व इतर यापासून पासून नववी व दहावीचे विद्यार्थी वंचित आहेत..शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने होऊन सुद्धा विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके उपलब्ध नव्हती.आदिवासी गोरगरीब भागातील सर्वच विद्यार्थी हजार रुपयाची पाठ्यपुस्तके,स्टेशनरी विकत घेऊ शकत नसल्यामुळे प्रभावी शिक्षणापासून ते वंचित होते.. सदर अडचण लक्षात घेता श्री. मोकाशी सर यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ बोरिवली मुंबईतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारसून व हातेरी या शाळेतील नववी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.

img 20220825 wa00316375219979039829809
img 20220825 wa00303331795211762469202
img 20220825 wa00295623452564842533020


सदर पाठ्यपुस्तके मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य, बालभारती पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, गोरेगाव, मुंबई येथे संपर्क साधून प्रत्यक्ष नोंदणी करून सारसुन शाळेसाठी 25,710/- तर हातेरी शाळेसाठी 22723 /- इतक्या रकमेची पुस्तके खरेदी केली सर्व रक्कम रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांनी शालेय खात्यावर ट्रान्सफर केली. सदर कामे हातेरी शाळेचे मुख्याध्यापक श्री. धूम सर, सारसुन शाळेचे श्री. राथड सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर कार्याबद्दल तालुक्यातील सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.

पाठ्यपुस्तके वितरणासाठी रोटरी क्लब ऑफ बोरिवली पूर्व चे अध्यक्ष देवेंद्रभाई, प्रकाशजी निर्मल,विशालभाई शहा,केंद्रप्रमुख घेगड साहेब, केंद्रप्रमुख महाले साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक उपस्थित होते. शैक्षणिक विकासात केलेल्या बहुमूल्य योगदान व सहकार्याबद्दल शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांचे मनापासून आभार मानले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *