स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘बाराखडी’ संस्थेच्या सदस्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘शाळा भेट अन् वाचन संवाद’ उपक्रम

स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘बाराखडी’ संस्थेच्या सदस्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘शाळा भेट अन् वाचन संवाद’ उपक्रम

स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘बाराखडी’ संस्थेच्या सदस्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘शाळा भेट अन् वाचन संवाद’ उपक्रम राबवला. संपूर्ण तलासरी तालुक्यात भारतीय ध्वज खांद्यावर घेत आणि संदेशाचा फलक सोबत घेऊन ६५ किलोमीटर पायी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी वनवासी प्रकल्प आणि कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी वाचनाबाबत संवाद साधला. उपक्रमाची खटपट आणि तो सुरु करण्यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलं. बाराखडी संस्थेचा मुख्यतः शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा मानस आहे आणि त्यापद्धतीने वाटचाल सुरू आहे. तसेच इतरही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे होत असतो.

प्रवास करत असताना रस्त्यावर पडलेले ध्वज उचलण्याचे काम तसेच उलट क्रमाने लावलेले भारतीय ध्वज सरळ करून ध्वजाचा सन्मान करण्याचं काम त्यांच्याकडून घडत होतं. शैलेश दिनकर पाटील, परमेश्वर घोडके, विकास ठाकरे आणि योगेश पवार या चौघांनी ही मोहीम पार पाडली.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी वेवजी केंद्रातील जिल्हा परिषद वांगडपाडा या शाळेत लायब्ररी सेटअपसाठी शंभर पुस्तकं देऊन ‘शाळा भेट अन् वाचन संवाद’ उपक्रमाची सांगता झाली. शाळेला मिळालेली पुस्तकं जिओलाईफ(Geolife) युथ क्लब मार्फत बाराखडीच्या वतीने देण्यात आली.

img 20220825 wa0022915996465144004409
img 20220825 wa00215780598465377495768

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *