बोध
दोन सिंह होते. एक तरुण आणि एक
वृद्ध. दोघे खूप चांगले मित्र होते. काही
कारणाने त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला.
दोघे एकमेकांचे शत्रू झाले. एके दिवशी
म्हातारा सिंह पाच पंचवीस कुत्र्यांनी घेरला
गेला. कुत्रे त्याच्या अंगावर जाऊ लागले.
तरुण सिंहाने ते पहातच अशी डरकाळी
फोडली की सर्व पाय लावून पळाले. हे सर्व
पाहून दुसऱ्या एका सिंहाने त्या तरुण
सिंहाला विचारले, ” तु त्या सिंहाला का
वाचवले?” तेव्हा सिंह म्हणाला की, आमचे
संबंध चांगले नसले तरी कुत्र्यांनी सिंहाच्या
अंगावर चालून जाण्या इतका समाज
कुमकुवत होणे धोक्याचे आहे.