विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक update करणे बाबत

राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इ. १ ली ते इ. १२ मध्ये शिकत असलेल्या सर्वच विदयार्थ्यांचे आधार नोंदणी करणे व अद्ययावतीकरणाचे काम पुर्ण करुन संबंधित विद्याथ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्याची खात्री (Validation) करणे आवश्यक आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयास, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयास आधार क्रमांक अपडेट करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यास पुरेसा प्रतिसाद प्राप्त झाल्याचे दिसत नाही किंबहुना तसा अहवाल या कार्यालयास प्राप्त नाही. तसेच शालेय विद्यार्थ्याचे आधार कार्ड सरल पोर्टलवर नोंद करणे, अपडेट करणे, व्हेरीफाय करणे इत्यादीबाबत दिनांक २१/७/२०२२ व दिनांक २९/७/२०२२ रोजी राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेवून सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापी अद्याप सदरचे कामात काही प्रगती झाल्याचे दिसून येत नाही.
सरल प्रणालीतील स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक यांच्या लॉगीनवर रिपोर्ट मेनूतील आधार मिसमॅच या उपमेनुमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधारमध्ये मिसमॅच आहे अशा विद्यार्थ्याचे आधार अपडेट व आधार प्रणाणित करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच आधार नोंद न केलेल्या व आधार इनव्हॅलीड असलेल्या विद्याथ्र्यांची माहिती अपडेट करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. सदर आधार पडताळणीसाठी सरल प्रणालीतील विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग (जेंडर) ही माहिती व आधार कार्डवरील विद्यार्थ्यांच्या माहितीशी जुळणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांची माहिती जुळेल अशा विद्याथ्र्यांचा डाटा आधार कडून व्हॅलीडेट होऊन फ्रीज होणार आहे.


याप्रमाणे शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्यात यावेत.

मुख्याध्यापक यांनी Student Portal वर संचमान्यता संदर्भात विद्यार्थ्यांच्या आधार बाबत कोणत्या गोष्टी काळजीपूर्वक पहाव्यात , ते पुढीलप्रमाणे समजून घेऊया.

👉 :- एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची माहिती Excel शिटद्वारे भरू नये , म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यांची आधार माहिती हि स्वतंत्र Update करावी.

👉 :- प्रलंबित विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती Student Portal मध्ये दि.29/09/2022 पर्यंत नोंदवणे आवश्यक आहे.

सरल प्रणाली अंतर्गत Student Portal मध्ये अद्यावत केलेल्या आधार क्रमाकांची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकाने पडताळणी करणे आवश्यक आहे.

👉 :- शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे विद्यार्थ्यांचे नाव , जन्मतारीख , तसेच इतर महत्वाच्या बाबी पडताळणी करून पोर्टल वर असलेल्या माहिती यामध्ये समन्वय आहे कि नाही याची खात्री करावी. दुरुस्ती असल्यास आधार वरील माहिती पाहून पुन्हा अद्यावत करावी.

👉 :- एकच आधार क्रमांक एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या समोर नमूद केला नसल्याची खात्री करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी.

👉 :- Student Portal मध्ये एकाच विद्यार्थ्यांचे नाव एका पेक्षा अधिक वेळा नमूद केले नसल्याची खात्री करून आवश्यक त्या दुरुस्ती करण्यात याव्यात .

👉 :- नवीन नोंद झालेले विद्यार्थी यांची आधार वरील माहिती काळजीपूर्वक भरणे.

👉 :- नवीन अथवा पूर्वीचे नोंद असलेले विद्यार्थ्यी यांची आधार क्रमांक माहिती तपासून पुन्हा एकदा खात्री करावी.

👉 :- आधार स्टेट्स या Tab वरून आधार संबंधित सर्व माहिती तपासून घ्यावी .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *