झाई मराठी शाळेत पर्यावरण पूरक रक्षाबंधन

झाई मराठी शाळेत पर्यावरण पूरक रक्षाबंधन

बहीण भावाच्या जिव्हाळ्याचा सण ! रक्षा बंधन ! जि प शाळा झाई मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदशनात शाळेत पर्यावरण पूरक रक्षा बंधन करून सण साजरा केला . या सणाला बाजरात मिळणाऱ्या राख्या न वापरता विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या . राख्या तयार करण्यासाठी टाकाऊ कागद , डायमंड , गम या वस्तूच्या साहयाने उत्कृष्ट राख्या बनविल्या . ह्या राख्या पर्यावरण पूरक आहेत . कागदाचा पुनः वापर करून राखी तयार केली .
बहीण भावाचे नाते जपत पर्यावरण शी बांधिलकी जपण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केलेला आहे . ह्या राख्या बनविण्यासाठी येणारा खर्च देखील नगण्य आहे .
पर्यावरण पूरक रक्षा बंधन करून पर्यावरण जपण्याची बांधिलकी विद्यार्थ्यांनी जोपासली आहे .या साठी शालेय शिक्षक वृंद , पालक यांचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *