“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”निमित्ताने जि प शाळा वेवजी सिगलपाडा शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन
10 ऑगस्ट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा वेवजी सिगलपाडा या शाळेत स्वच्छता मोहीम
चित्रकला स्पर्धा ,निबंध स्पर्धा, रांगोळी रेखाटन अशा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी तिरंग्यावर आधारित सुंदर चित्रे रेखाटली. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यचिन्हे, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, पाणी हेच जीवन, वारली चित्रे, स्वच्छता मोहीम, हर घर तिरंगा घोषवाक्ये या विषयावर चित्र रेखाटन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. शाळेमध्ये आज विशेष स्वच्छता मोहीम राबवली गेली. या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासोबतच देशभक्ती ची भावना रुजवता येईल अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली.
या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका चिखलीकर मॅडम, चौगुले सर, तांडेल सर, सुगंधा मॅडम,ज्योती मॅडम, अमोल सर, लव्हारे सर, ननावरे सर, शेळके सर आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
हर घर तिरंगा । हर मन तिरंगा ।
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳