
संत कृपा झाली ।
इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया ।
भारिले देवालया ।
नामा तयाचा किंकर ।
तेणे विस्तरिले आवार ।
जनी जनार्दन एकनाथ ।
स्तंभ दिला भागवत ।
तुका झालासे कळस ।
भजन करा सावकाश ।
बहिणा फडकती ध्वजा ।
तेणे रूप केले ओजा ॥
हा आहे आज पंढरपूरला जमलेल्या लाखो भक्तांच्या वैभवाचा.. जगात भगवंत भक्तीने समतेचे राज्य निर्माण करणाऱ्या भागवत धर्माचा इतिहास.हा अभंग आहे संत बहिणाबाईंचा. देवगाव.. रंगारी (ता.कन्नड) येथे जन्मलेल्या या संत तुकोबांच्या शिष्या (१६२८-१७००). वारकरी पंथातील महत्त्वाच्या स्त्री संत. त्यांचे जीवनच तुकामय. वयाच्या ५ व्या वर्षीपासून परमार्थाकडे ओढा.पूढे कीर्तनातील तुकोबारायांचे अभंग ऐकून त्या एवढ्या प्रभावीत झाल्या की वैकुंठवासी तुकोबांचाच अनुग्रह घेण्याचा निर्धार केला. तुकोबांना गुरु मानून भक्ती सुरू ठेवली. अखेर वैकुंठगमनानंतर तुकोबांनी दर्शन देत अनुग्रह दिल्याचे त्या अभंगात सांगतात. अनुग्रहानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात अभंग लिहलेत.पृथ्वीवरील पवित्र ठिकाण.. संतांचेही माहेर पंढरीच्या अंगणी भक्ती सागर उसळलाय. भगव्या पताकांचेच राज्य. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष सुरू आहे. सर्वत्र आनंदी आनंद कारण उन.. वारा पाऊस अंगावर घेत अखेर आज विठुरायाचे दर्शन होणार* *सर्वच संत मंडळींच्या पालखी बघून वारकरी आनंदाने त्या त्या पालखीचा इतिहास उत्साहानं एकमेकांना सांगत आहेत. ते बघा, शेगावचे संत गजानन महाराजही आलेत. ती रुख्मिणी मातेची पालखी. त्यांच्या माहेरुन अर्थात अमरावती जवळच्या कौडिंण्यपूरहून आलीय. ४० मुक्काम होतात या पालखीचे.* *विठ्ठल दर्शनाचा दिवस म्हणजे माऊली म्हणतात 'अजि सोनियाचा दिनू'. हे सुखाचे आगरच आज सापडलेय. तर तुकोबा म्हणतात 'आनंदाचे डोही आनंद तरंग'. देव म्हणजे अंतकरणातील पवित्र भाव. या संकल्पनतेवर अतूट विश्वास असणे ही तर पुर्वजन्माची पुण्याई, असे माऊलींना वाटते. सश्रद्ध भक्त हे पापभिरु असतात. हा विठ्ठल चराचरातही आहे म्हणून त्याची भेट हा सोनियाचा दिन.* *वारकऱ्यांना आपल्या आराध्या विषयी प्रचंड आस्था असते. दर्शनासाठी मन व्याकुळ होते. जे कष्ट झेलले आहेत.. ते कष्ट परावर्तीत होतील विठ्ठल कळसाच्या दर्शनात. त्यांचे आनंदाश्रू ही आगळी अनुभुती. आज वैष्णवांची दिवाळीच.. अवघे पंढरपूर गर्जत आहे विठुनामाचा गजर.*
संकलित : साभार वेब सोर्स ,
