MSCE Scholarship Exam 2022 Registration
MSCE : पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
MSCE Scholarship Exam 2022 Registration – Corona’s background led to a delay in taking the scholarship exam last year. Similarly, the students did not get direct guidance from the teachers. As a result, there was a big drop in the results of the scholarship examination. But, now the schools have started following the rules regarding corona. Students are able to study in the classroom. So scholarship classes can also be started offline. Maharashtra State Examination Council has started filling up applications for Class V and VIII Scholarship Exam. The scholarship examination will be held on February 20, 2022. Students will be able to fill up applications (MSCE Scholarship Exam 2022 Registration) with regular fees from 1st December to 31st December 2021
MSCE Scholarship Exam 2022 Registration
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ डिसेंबर 2021 ते ३१ डिसेंबर 2021 ( 1 DECEMBER 2021 TO 31 DECEMBER 2021 ) पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यास विलंब झाला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली. परंतु,आता कोरोना विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती वर्ग सुद्धा ऑफलाइन पद्धतीने सुरू होऊ शकतात.
परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना २०० रुपये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन FORM भरताना अनिवार्य बाबीं / कागदपत्रे : MSCE Required Documents
१. विद्यार्थ्याची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb पेक्षा जास्त नसावी.)
२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी)
३. विद्यार्थ्याचे पालक रु. २०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)
४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.
परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती : About MSCE SCHOLARSHIP Exam 2022
१. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात देण्यात येतील.
२. उत्तरपत्रिकांची तपासणी OMR पध्दतीने केली जाते.
३. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी (छायाप्रत ) देण्यात येणार नाही.
४. उत्तरपत्रिकेत गिरवलेली / खाडाखोड केलेली उत्तरे ग्राहय धरली जाणार नाहीत. एकदा नोंदविलेले उत्तर बदलता येणार नाही.
५. कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. अशा उत्तरांना शून्य गुण दिले जातील
६. शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे, उत्तरपत्रिकांची तपासणी शिष्यवृत्तीधारकांची निश्चिती, विद्यानिकेतन प्रवेश निवड याद्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका / प्रमाणपत्रे व परीक्षेची सर्व सांख्यिकीय माहिती संगणकावर तयार केली जाते.
विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत : AADHAR & BANK ACCOUNT
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या बँक खात्याची bank account माहिती (बँकेचे नाव, IFS Code व बँक खाते क्रमांक) आणि विद्यार्थ्याचा आधार* aadhar* number* क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक aadhar enrollment number उपलब्ध असल्यास नमूद करावा. परंतु सदर बाबी अनिवार्य नसल्याने बँक खात्याचा तपशील किंवा आधार क्रमांकासाठी विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
ऑनलाईन आवेदनपत्र online application भरण्याबाबतचा सविस्तर मार्गदर्शन करणारा व्हिडीओ लवकरच ब्लॉगवर उपलब्ध होईल. सदर अधिसूचना खालील दिलेल्या pdf मध्ये आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पुढील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. www.mscepune.in व https://www.mscepuppss.in