मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे असे नेहरुजी म्हणत . म्हणून या विचारातून नेहरूंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले . मुलं काय शिकतात ; यापेक्षा त्याच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे. याबाबत ते नेहमी आग्रही असत.मुले व फुले या बाबतचा जिव्हाळा नेहरूंच्या रोमारोमात भिनलेला होता. एकदा तर होळीच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी शाळकरी मुल आली आहेत, हे कळताच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उठून ते मुलांवर रंग उधळण्यासाठी मुलांच्या दिशेने धावले. मुठीमुठीने त्यांनी मुलांवर रंग, गुलाल उधळला; परंतु आपल्यावर गुलाल उधळण्यास मुले संकोच करीत असल्याचे त्यांना जाणवले. मी तुम्हाला मोठा वाटतो का ? असे असेल तर मी खाली बसतो आणि सांगा बघू आता कुठे आहे मी मोठा ? झाला की नाही आता लहान! अगदी तुमच्या एवढा ! आता चला उडवा माझ्या वर गुलाल ! आपलं वय विसरून, आपलं मोठेपण विसरून ते लहान मुलांमध्ये लहान होत. जणू अगदी बाल नेहरू! मुलांना ते देवाघरची फुलं अशी उपमा देत असत. म्हणूनच मुले नेहरूंना चाचा नेहरू म्हणत असत.
14 नोव्हेंबर हा नेहरूंचा जन्मदिवस भारत देशात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Posted inBaldin