रक्षाबंधन

happy raksha bandhan greeting design with leaves 1017 19989

आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा, असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहिण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते.

  भाऊ बहिणीच्या या प्रेमाला उधाण येतं ते राखी पौर्णिमेला ! या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते.  या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख शांती लाभू दे ! अशी प्रार्थना करते ; तर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी आठवणीने राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहिण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते. तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देवून खुश करतो. या दिवशी श्रावणी करणे हा प्रकार असतो श्रावणी करणे म्हणजे मन शुद्ध करणे !

  बहिण भावाचे नाते दृढ करण्यासाठी मित्रत्व स्नेह व परस्परांवरील प्रेम वृद्धीगंत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *