Zural

झुरळ एक होते झुरळचालत नव्हते सरळबसमध्ये चढले तिकीट नाही काढलेसिटखाली दडलेसरळ घर गाठले https://youtu.be/INZkX5AHM-s

अटक मटक

अटक मटक चवळी चटकचवळी लागली गोड गोडजिभेला आला फोड फोडफोड काही फुटेनादारचा पाव्हणा उठेनाजिभेचा फोड फुटला दारचा पाव्हणा उठला

इथे इथे बस रे मोरा

इथे इथे बस रे काऊ बाळ घाली जेऊ चारा खा, पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जाइथे इथे बस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा पाणी पी बाळाच्या डोक्यावरून…

घार आली

घार आली घार आलीलपा लपा पिलानो घार आली मोठी सांभाळ आपली रोटी घार आली बारीकसांभाळ आपली खारीक

आपडी थापडी

आपडी थापडीगुळाची पापडीधम्मक लाडू , तेल काढू !तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान चाऊ माऊ चाऊ माऊपितळीतले पाणी पिऊहंडा पाणी गडप !

IRING MIRING

इरिंग मिरिंग इरिंग मिरिंग लवंगा तिरिंगलवंगा तिरचा डुगडुग बाजागाई गोपी उतरला राजा

Gar gar giraki……

गरगर गिरकी गरगर गिरकी ताकाची फिरकी, लोण्याचा गोळा गळळ गडप अंग नाचे तंग नाचे रंगाची डोई नाचे मी नाचे बाबु नाचे बाबूजी शेंडी नाचे

Zim Pori Zim

झिम पोरी झिम झिम पोरी झिम कपाळाच भिंग भिंग गेलं फुटून पोरी आल्या उठून आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो

Gogal Gaay

गोगलगाय गोगलगाय पोटात पाय इकडून तिकडे हळूच जायडोईवर शिंगे घेऊन संगे इकडचा निरोपतिकडे सांगे हळूच बोलतेकानात सांगतेगुपित आपले मनात ठेवते

Lahan Mazi Bahuli

लहान माझी बाहुली लहान माझी बाहुली मोठी तिची सावलीघारे डोळे फिरवीते, नकटे नाक उडवितेदात काही घासत नाही अंग काही धुवत नाहीभात केला कच्चा झाला पोळ्या केल्या करपून गेल्या वरण केलं…