अंकगणित ARITHMETIC
ARITHMATIC
NAVODAYA ENTRANCE TEST ARITHMETIC STANDARD 5
NAVODAYA ENTRANCE TEST ARITHMETIC STANDARD 5
NAVODAYA ENTRANCE TEST ARITHMETIC STANDARD 5

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
या विभागाचा उद्देश विद्यार्थ्यांची अंकगणिताची मूलभूत कौशल्ये आणि प्रावीण्य अजमावणे हा आहे.
(1) ‘जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश’ या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गणित या विषयावर 20 प्रश्न असतात आणि 25 गुण असतात. प्रत्येक प्रश्न अनिवार्य असतो. प्रत्येक बिनचूक उत्तरासाठी 1.25 गुण दिला जाईल.
(2) विद्याथ्यांनी उत्तरपत्रिकेत नेमून दिलेल्या जागेतच आकडेमोड अगर कच्चे काम करावे.
(3) या उत्तरपत्रिकेत फक्त आंतरराष्ट्रीय आकड्यांचाच (उदा., 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,0) उपयोग करायचा अस
(4) प्रत्येक प्रश्नासाठी (A) (B) (C) (D) अशी चार पर्यायी उत्तरे दिलेली असतात. त्यांतील एकच उत्तर अचूक अचूक उत्तर शोधून त्याच्याशी संगत अक्षर दर्शवणारे वर्तुळ गडद करायचे असते.
(5) जवाहर नवोदय परीक्षेच्या तिन्ही विभागांसाठी असलेल्या एकूण दोन तासांपैकी 30 मिनिटांत अंकगणिताचा सोडवून पूर्ण होईल, एवढी काळजी घ्यावी.
• गणित या विषयावरील प्रश्न पुढील 15 घटकांवर आधारित असतात :
(1) संख्या आणि संख्या पद्धती.
(2) पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया.
(3) अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया.
(4) अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म.
(5) संख्यांचे मसावि आणि लसावि.
(6) दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया.
(7) दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांत रूपांतर.
(8) लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन (पैसा) इत्यादी राशींचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग.
(9) अंतर, काळ आणि गती यांचे मापन.
(10) गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण.
(11) गणितीय सूत्रांचे सरलीकरण.
(12) शतमान आणि त्यांचे उपयोग.
(13) नफा-तोटा.
(14) सरळव्याज.
(15) परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ (आकारमान).