BHARATRATNA DHONDO KESHAV KARVE
धोंडो केशव कर्वे -BHARATRATNA DHONDO KESHAV KARVE
─┅━━●●★◆★●●━━┅─
_समाजसुधारक,पद्मभूषण,भारतरत्न_
*_”यांच्या जयंती निमित्त_*
*_विनम्र अभिवादन”_*
◆टोपणनाव :~ अण्णा
*◆जन्म : ~ १८ एप्रिल१८५८, मुरूड*
◆मृत्यू :~ ९ नोव्हेंबर १९६२
◆चळवळ :~ स्त्री शिक्षण आणि
सामाजिक सुधारणा
◆पुरस्कार : ~ भारतरत्न
*🔰धोंडो केशव कर्वे🔰*
महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांनी इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी – पार्वतीबाई आठवले – या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘`निष्काम कर्म मठा’ची स्थापना इ.स. १९१० साली केली.
अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबली करणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.
अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या. अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी. लिट. देऊन सन्मानित केले. ‘पद्मविभूषण’ हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना *भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान “भारतरत्न” ने सन्मानित करण्यात आले.* एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आजही ‘कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.