Marathi Prarthana – Ek Pratidnya ase amuchi

मराठी प्रार्थना – एक प्रतिज्ञा असे आमुची …..

एक प्रतिज्ञा असे अमुची

एक प्रतिज्ञा असे अमुची ज्ञानाची साधना

निरंतर ज्ञानाची साधना .....२

ज्ञान हेच संजीवन सार्‍या जगताच्या जीवना ।।धृ.।। निरंतर .....

ज्योत जागवू सुजाणतेची , सकलांच्या अंतरी

तीच निवारील परत तमाचे , प्रभाव सूर्यापरी

ज्ञानच देऊळ ज्ञानच दैवत, प्रगतीच्या पूजना ।।१।। निरंतर ....

नव्या युगाचा नव्या गुणाचा, ज्ञान धर्म आहे

त्यातच अमुचा उदय , उद्याचे आश्वासन आहे

मुक्त करील तो परंपरेचा , अंगी धरा गुण भला ।।२।। निरंतर ....

हाच मंत्र नेईल आम्हाला , दिव्य भविषयाकडे

न्यायनीतीचे पाऊल जेथे भेदाशी ना अडे

जे जे मंगल, पावन त्यांची, येथे आराधना ।।३।। निरंतर ....

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *