मराठी प्रार्थना – देव दयेचा अथांग सागर …..
देव दयेचा अथांग सागर
देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो अपुले घर ।।धृ.।।
मेघ घटातुनी जल तो ओती
मातीतून तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर ।।१।।
आईरूपे माया करितो
पिता होवूनी सदा रक्षितो
गुरु स्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगाचा तो जगदीश्वर ।।२।।
राम होवुनी वचन पाळितो
कृष्ण मुखाने गीता कथितो
बुद्ध होवुनी शांती निर्मितो
अनंत रुपे एकच ईश्वर ।।३।।